सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : संदीप नाईक प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पडलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेचा गुरुवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बक्षीस समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कलाप्रेमी नागरिकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती संपत शेवाळे, माजी सभापती शुभांगी पाटील, भाजपा महामंत्री सुरज पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज त्यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मकतेला मोठे व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये ६० शाळांमधील पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. भारतीय सण उत्सव, स्वच्छ भारत अभियान नवी मुंबई, माझे आवडते उद्यान, नवी मुंबईतील आगरी कोळी संस्कृती, नवी मुंबईतील एक प्रेक्षणीय स्थळ, भारतीय सण उत्सव, नवी मुंबईतील जैवविविधता, नवी मुंबई मेट्रो आणि नवी मुंबईचे पर्यावरण संवर्धन असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम तसेच चषक बक्षीस स्वरूपात देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात
आली. त्याचबरोबर सहभागी शाळांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपले विचार मांडताना संदीप नाईक म्हणाले, चित्रकला हे समाज जागृतीचे प्रभावी माध्यम आहे. चित्रांमधून विद्यार्थ्यांचे विचार, कलात्मकता आणि सर्जनशीलता याबरोबरच भूमिकाही व्यक्त होत असते. स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयातून नवी मुंबईचा विकास, स्वच्छता, पर्यावरण आदी मुद्द्यांशी विद्यार्थी जोडले गेले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शहराविषयी आपुलकी आणि देशाविषयी कर्तव्यभाव निर्माण करण्याचा हेतू होता. केवळ निवडणुका आल्या म्हणजे सामाजिक उपक्रम राबवायचे असे नाही तर लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आम्हाला सामाजिकतेची शिकवण दिली असून गेली ३२ वर्षे या विचारानुसार कला, क्रीडा, सामाजिक उपक्रम निरंतर राबवित आहोत, असे नमूद करून संदीप नाईक यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने एक तरी छंद जोपासावा, असे आवाहन केले. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक विलास देवरे आणि कलाशिक्षक राजाराम अहिरराव यांनी उत्तम प्रकारे केले.
कलाशिक्षक देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संदीप नाईक यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलेचे मोठे व्यासपीठ निर्माण करून दिल्याचे सांगितले. नवी मुंबई विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज गुरव यांनी कला महोत्सव, क्रीडा महोत्सव, सराव परीक्षा इत्यादी उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास संदीप नाईक यांनी साधल्याचे म्हटले. तर भारती विद्यापीठाचे कलाशिक्षक लोहार सर यांनी संदीप नाईक हे नवी मुंबईचे भावी कलाकार घडवीत असल्याचे गौरव उद्गार काढले.
यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती संपत शेवाळे, माजी सभापती शुभांगी पाटील, भाजपा महामंत्री सुरज पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेढकर, माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज, समाजसेवक सुरेश शिंदे, गणेश भगत, सुनिकेत हांडेपाटील, भाऊ भापकर, जगन्नाथ कोळी, सुनील सुतार, माजी नगरसेवक शशिकांत भोईर, मुकेश पष्टे सर, बाळकृष्ण बंदरे, दीप्ती कोळी, सुनील कुरकुटे, अक्षय पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील, उर्मिला शिंदे, महाजन सर, संतोष शेट्टी, अक्षय नकाते, वृषाली बापट, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, सुदत्त दिवे, राजेश ठाकूर, सुभाष गायकवाड, नरेंद्र म्हात्रे, प्राचार्य प्रताप महाडिक, सुधीर थळे सर त्यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.