नवी मुंबई : गणेशोत्सव जवळ आलेला असतानाही उलवे नोडमधील रस्त्याची दुरावस्था कायम होती. कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सिडको अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने या रस्त्याची समस्या संपुष्ठात येऊन रस्त्यांची डागडूजी झालेली आहे. रस्ते समस्या महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याने निकाली निघाल्याने उलवेवासिय महेंद्र घरत यांना धन्यवाद देत आहेत.
उलवे नोडमधील रस्त्याच्या दुरस्तीसाठी महेंद्र घरत यांनी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सिडको अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी करुन महेंद्र घरत यांनी समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. सिडकोने महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्याची दखल घेत गणेशोत्सवापूर्वीच रस्त्याची दुरुस्ती केल्याने वाहनचालकांनाही दिलासा मिळाला आहे.