स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी ‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ या ध्येयाने मनसेच्या वतीने मोफत किल्ले दर्शन आयोजित केले आहे.
वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सिवूडस येथील मुलां-मुलींसाठी गजानन काळे यांनी शिवजन्मभूमी असलेल्या शिवनेरी दुर्गची निवड केली असून किल्ले दर्शनाचा लाभ घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ९६५७३०३१७५, ९८१९३१७२९३ या क्रमाकांवर २५ सप्टेंबरपर्यत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांना इतिहास वाचता नाही तर अनुभवता यावा, जिथे इतिहास घडला, त्या भूमीचे दर्शन व्हावे यासाठी मोफत किल्ले दर्शन अभियान आयोजित केले असल्याची माहिती देत या अभियानात अधिकाधिक संख्येने मुला-मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी केले आहे.