जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यामार्फत संपुर्ण महाराष्ट्रात तसेच जुन्नर तालुक्यातील पर्यावरण संरक्षण व नदी स्वच्छता मोहीमेतंर्गत जल प्रदूषण रोखण्यासाठी श्री गणेशोत्सवामध्ये जमा झालेले निर्माल्य संकलनाचे काम डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सर्व गणेश भक्तांनी गणरायाची चांगल्या प्रकारे दहा दिवस भक्ती भावाने सेवा करून अनंत चतुर्थीच्या दिवशी उत्साही आणि जल्लोषमय वातावरणात गणरायाला निरोप देताना अक्षरशः काहींच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले.
सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून गेले अनेक वर्षापासून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आणि पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी नदी प्रदूषित होऊ नये नदी प्रदूषित झाल्यास ते पाणी आपल्या वापरात आल्यास त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून जुन्नर तालुक्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्याकडून निर्मल्य संकलनाचा उपक्रम जुन्नर तालुक्यात राबवण्यात आला आहे. त्यामध्ये नारायणगाव, वारूळवाडी, चिणमवाडी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पिंपळवंडी, उदापूर, आणि डिंगोरे याठिकाणी सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत श्रींच्या विसर्जनापर्यंत या प्रतिष्ठानच्या साधारणपणे २२५ ते २५० सदस्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जुन्नर तालुक्यात हा निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातमधून साधारणत: १५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.
निर्माल्य संकलन करण्याचा उपक्रम राबवत असताना सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तालुक्यात २२५ ते २५० श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभाग घेतला होता. हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे सर्व सामान्य नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून या कार्यक्रमासाठी श्री गणेशभक्त स्थानिक सर्व ग्रामपंचायतचे, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सेवक, तसेच स्थानिक नागरीकांचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आले व सर्व ग्रामस्थ, श्री गणेशभक्तांना तसेच, सर्व गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आणि ग्रामपंचायत सेवक वर्ग, ग्रामस्थ यांचे आभार मानले आणि धन्यवाद दिले.