सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या कार्यप्रणालीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, झोपडपट्टीवासियांना एसआरए योजनेअंर्तगत घरे देण्यासाठी युती सरकार वचनबद्ध असून शासकीय बैठक लावून सर्वे सूरू करू, असे आश्वासन विजय नाहटा यांनी दिले.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सुरेश कोरे यासह शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी सिबिडी येथील पंजाब हेरिटेज भवन सभागृहात झालेल्या शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सुरेश कोरेसह त्यांचे समर्थक प्रमुख पदाधिकारी किशोर गायकवाड, किसन वाणी, विनोद लगाडे, अनिल सोनावणे, श्रीकांत गायकवाड, सत्यम सोनकांबळे, शशिकांत गायकवाड, ज्ञानेश्वर बाविस्कर, कुंदन सोनकांबळे, काशिनाथ चौधरी यासह शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी बोलताना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले की, राज्याचे युती सरकार महिला, जेष्ठ नागरिक, युवक आदि सर्वच घटकासाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याने सरकारची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वपक्षीय कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत प्रवेश करत असून आतापर्यंत
सुमारे दोन हजार सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा बेलापूर विधानसभा मतदारसंघात पक्ष प्रवेश झाला आहे. झोपडपट्टीवासियांना आहे त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त एसआरए योजनेतून घरे मिळवून देऊ आपण निश्चित रहा, असे उपनेते विजय नाहटा यांनी बोलताना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर उपनेते विजय नाहटा यांच्यासह शिवसेनेचे अशोक कर्मी, ललित बुंदेला, जयश्री भिवडे, मथुराताई पाटील, लक्ष्मी कोरे, अंजना भोईटे, किसन वाणी आदि उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.