सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशी सिडको ऑडिटरियम हॉल येथे भारतीय जनता पार्टी आयोजित कोकण-ठाणे विभाग कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने
बेलापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये केलेल्या ‘विकास कामांच्या कार्य अहवालाचे’ लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री, अमित शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे उपस्थित होते.