नवी मुंबई : संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, १३ ऑक्टोबर रोजी नेरूळ प्रभाग क्रमांक ९६/९७ मधील सोसायटयांना कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. सोसायट्यांच्या पदाधिकारी व रहिवाशांनी माजी आमदार व भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आभार मानले.
यावेळी नवी मुंबई भाजपा चिटणीस गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत, समाजसेवक संजय पाथरे, पांडुरंग बेलापुरकर, दादा पवार, अशोक पिंगळे, वैभव जाधव, दिपक पवार, अशोक गांडाळ, विकास तिकोणे, सागर मोहिते, रविंद्र भगत उपस्थित होते.
संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने व मा.नगरसेवक तथा सभागृह नेते श्री.रविंद्र इथापे यांच्या माध्यमातून नेरूळ वॉर्ड क्र.१०० व वॉर्ड क्र. ९१ मधील सेक्टर १९ ए, सेक्टर १९, सेक्टर १७, सेक्टर १३,सेक्टर २१ मधील सर्व सोसायट्यांना त्यांच्या सदस्य संख्येप्रमाणे कचराकुंड्यांचे (डस्ट बिन)चे वाटप कार्यक्रम नगरसेवक रविंद्र इथापे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरच्या जागेत संप्पन्न झाला. यावेळेस सर्व सोसायटींचे प्रतिनिधी चेअरमन, सेक्रेटरी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते..
प्रभाग ८५-८६ मध्येही शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर सहा, सारसोळे गावातील गृहनिर्माण सोसायट्यांना कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.
महापालिका प्रशासनाकडून सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी सोसायट्यांना कचराकुंड्यांचे वितरण करण्यात आले होते. अधिकांश गृहनिर्माण सोसायटीतील कचराकुंड्या तुटलेल्या होत्या. सृजनांशी संवाद साधताना गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना माजी आमदार व नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या चाणाक्ष नजरेने तुटलेल्या कचराकुंड्यांची समस्या वेधली आणि तात्काळ संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने ठिकठिकाणी कचराकुंडी वितरण सुरु झाले आहे.