स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
१५१, बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या निकालामध्ये स्पष्टता नसून संशयाला दाट शक्यता आहे. या निकाला विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांनी दिली आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. अवघ्या ३७७ मतांनी या मतदारसंघात अनपेक्षित निकाल लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण फेर मतमोजणी करावी, यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज देण्यात आलेला होता. परंतु ही मागणी निवडणूक आयोगाने अमान्य केली. सर्व ईव्हीएम मशीनच्या फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर सर्व व्हीव्हीपॅट मशीन मधील स्लीपांची फेर मोजणीची मागणी करण्यात आली होती. १६ उमेदवारांना मिळालेल्या मतांची योग्य टॅली किंवा विभागणी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. परंतु ती नाकारल्याने कोर्टात न्याय मागण्याचा निर्णय घेतल्याचे संदीप नाईक म्हणाले.
दरम्यान संदीप नाईक यांना ९१४७५ एवढ्या भरघोस मतांचा आशीर्वाद बेलापूर मतदार संघातील नागरिकांनी दिला. या निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातील मतदारांचे, आणि निवडणुकीसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले सर्व नगरसेवक, सहकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले आहेत.