नवी मुंबई : रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेना मुख्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रविवार दि. २२ डिसेंबर रोजी नवी मुंबई शहर अध्यक्ष वीरेंद्र लगाडे साहेब यांच्या पुढाकाराने नवी मुंबई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
यावेळी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, रिपब्लिकन सेनेच्या पदाचे महत्व समजावून तळागाळातील लोकांसाठी कामे करा, मला तुमच्यातील नगरसेवक, आमदार झालेले पाहायचे आहेत आणी त्यासाठी सर्वांनी मेहनत करून लवकरात लवकर संघटन बांधणी पूर्ण करा असा आदेश त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिला.
आणि रिपब्लिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सर सेनानी आनंदजी राज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने संदीप सहदेव सूर्यवंशी- नवी मुंबई उपाध्यक्ष, सुनील साळवे. नवी मुंबई जिल्हा सचिव, वैजनाथ दिगंबर भोसले. संघटक, रवींद्र दशरथ खंडागळे. जिल्हा खजिनदार, शशिकांत कांबळे. जिल्हा उपसचिव, विनोद गौडर ऐरोली तालुका उपाध्यक्ष, स्वप्निल मोरे. ऐरोली तालुका संघटक, राजेंद्र सुरवसे. ऐरोली तालुका उपसचिव,
मंथन खंडागळे. ऐरोली तालुका, खजिनदार, गितेश कांबळे. ऐरोली तालुका उपसंघटक, रमेश गायकवाड. ऐरोली तालुका सल्लागार, अक्षय कांबळे. बेलापूर तालुका सचिव, वारिस अली शेख. ऐरोली, नितेश कांबळे. वाशी, सौ सुश्मिता मोहिते. अध्यक्ष. नेरूळ शहर, या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसांमध्येच नवी मुंबई मधील असंख्य कार्यकर्ते हे रिपब्लिक सेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत त्यांच्या देखील नियुक्ती अशाच प्रकारे होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विरेंद्र लगाडे यांनी दिली.
या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेना राष्ट्रीय सरचिटणीस संजीव बौद्धनकर, सचिव विनोद काळे, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चासकर, नवी मुंबई महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई इंगळे, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष भगवान साळवी, भारतीय कांबळे जिल्हा सचिव, ऐरोली तालुका अध्यक्ष उलफत ताई पठाण, ऐरोली तालुका सचिव सना शेख, ऐरोली विभाग अध्यक्ष वैशाली कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.