नवी मुंबई : कै. हाल्या रामजी भगत यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त देवाची आळंदी येथील सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प नारायण महाराज काळे यांच्या हरिकिर्तनाचे मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ सेक्टर २८ मधील प्लॉट क्रं २५ वरील त्रिमूर्ती भवन येथे सकाळी १.३० ते १२ या वेळेत किर्तन होणार आहे. या किर्तन सोहळ्यात नेरूळवासियांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन गणेश भगत, रविंद्र भगत, किस्मत भगत यांनी संयुक्तपणे केले आहे.