सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात ५ जानेवारी रोजी राज्यभरात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली असून त्याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या तडफदार लोकप्रिय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित बेलापूर मतदारसंघातील नेरूळ प्रभाग क्र. ९७ या प्रभागापासून या अभियानास प्रारंभ झाला. विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक वियाजानंतर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच भाजपमध्ये सहा वर्षातून एकदा संघटन पर्व होत असते. या पर्वात केंद्रापासून तर प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता नोंदणी प्रक्रियेला सुरूवात होते. देशभरात वर्षभर संघटन पर्व सुरू आहे. राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणाऱ्या आणि जगभरात सर्वात जास्त प्राथमिक सदस्य असलेला एकमेव भाजप पक्ष आहे. या विचारधारेसोबत सर्वांना जोडायचे आहे. परंतू, ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या त्याठिकाणी संघटन पर्वाची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका संपल्याचा दुसऱ्या दिवशीपासूनच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांना तात्काळ हे संघटन पर्व सुरू करण्याचे निर्देश दिले होते आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्राथमिक सदस्यता नोंदणी सुरू आहे. १५१ बेलापूर मतदारसंघामध्ये ३० ठिकाणी सदस्य अभियानाची नोंदणी सुरु आहे. तसेच आतापर्यंत ५९३६ सदस्य नोंदणी झाली आहे. २० जानेवारीपर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. तसेच सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासमवेत समाजसेवक राजू तिकोने, समाजसेविका उल्का तिकोने, मकरंद म्हात्रे, ऋषिकेश भुजबळ, सुजित भोर, सचिन दिघे, अक्षय शिरगावकर, विजय पोटे, अरविंद इंगवले, संतोष बारवे, वसंत जगताप, संपत तोडकर, अभिजीत भोर, मनोज भुमकर, विजय भोर, संजय फंड, महेश बोत्रे, राजेश चौटाला, अनंत रजपूत, विलास पार्टी, बबन पाटील, शेखर पाटील, सिद्धेश पाटील, श्रीकांत गटे, विक्रम कदम, महादेव इंगळे, शांताराम झावरे, पंढरीनाथ बोरुडे, अर्चना नाईकडे, माया पोळ, तृप्ती शिंदे, सुषमा तोरणे, ललिता पाटील, सुरेखा हुंडारे, स्नेहा पाटील, पिंकी सिंग, रूपाली जाधव, सुवर्णा थोरात, तेजश्री भोर, सोनाली भोर, मंजू सिंग, प्रिया सिंग, वंदना सिंग, ममता तिवारी, स्नेहा यादव, पुनम सिंग, स्नेहलता सानप, शैला कुराडे, सीमा सिंग तसेच असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.