स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका शाळा क्र.३६, कोपरखैरणेगाव येथील माजी विद्यार्थिनी कु.राबिया सागर शेख हिची ‘इंडिया खेलो फुटबॉल लीग – २०२५ (आयकेएफ-४)’ साठी पश्चिम विभागाकडून संघाची कर्णधार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. ही बाब नवी मुंबई महापालिकेसाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तिचे अभिनंदन करीत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, शिक्षण अधिकारी अरुणा यादव, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते.
कु. राबिया शेख हिने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये –
(1) सुब्रतो रॉय फुटबॉल कप – उपविजेतेपद, (2) DSO फुटबॉल स्पर्धा – विजेतेपद, (3) मुंबई फुटबॉल लीग – विजेतेपद, (4) TFC ठाणे फुटबॉल लीग – विजेतेपद – अशा अनेक स्पर्धांचा समावेश आहे.
तिला फुटबॉल प्रशिक्षक रोहन जगताप, ज्ञानेश्वर घुगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संघ व्यवस्थापक योगेश सुर्वे, कुणाल कोषटवार, अश्विनी सावले यांचेही वैयक्तिक मार्गदर्शन लाभले आहे. नवी मुंबई महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व शिक्षक प्रशांत गाडेकर यांचेही उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. नमुंमपा शाळा क्रमांक ३६ कोपरखैरणे गाव येथील विद्यार्थ्यांसाठी राबियाने प्रेरणादायी कामगिरी केली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.