नवी मुंबई : सानपाड्यातील विवेकानंद संकुलातील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी संगम लोककलेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात शाळेचे स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण समारंभ होणार असून विविधतेतून एकतेचा आविष्कार दाखविणाऱ्या संगम लोककलेचा कार्यक्रमही सादर केला जांणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून संस्कार इन्फो टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीस संचालक सुनील खन्ना, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे निर्माते दिपक पळसुले, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे कोषाध्यक्ष विश्वास सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास शाळेच्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी तसेच सानपाडावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक विलास वाव्हळ यांनी केले आहे.