• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 21, 2025

नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडणार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबईत स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्याचे काम तात्काळ न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडणार

माजी आमदार संदीप नाईक यांचा इशारा
नवी मुंबई  : शासनाने सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविणार नसल्याचे जाहीर केले असतानाही नवी मुंबई शहरात नागरिकांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांचा विरोध असतानाही महावितरण कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड विद्युत मीटर बसविण्यात येत आहेत. हे काम तात्काळ थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. वाशी विभागाचे अधीक्षक-अभियंता यांना याविषयी पत्र पाठवून त्यांनी मागणी केलेली आहे.
वीज कायद्यानुसार कोणते मीटर बसवायचे याचा अधिकार ग्राहकांना असतो. परंतु नवी मुंबईमध्ये ग्राहकांची परवानगी नसताना त्यांचे जुने मीटर परस्पर काढून महावितरण त्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवत आहे. या अघोषित प्रीपेड मीटर सक्तीला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. जोपर्यंत नागरिकांकडून मागणी होत नाही अजिबात प्रीपेड मीटर बसवू नयेत, असे माजी आमदार संदीप नाईक यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे दुप्पट बिल आकारणी, पैसे भरूनही वीज पुरवठा सुरू न होणे अशा अडचणी उद्भवतात. शहरातील अनेक विज ग्राहकांची आधी पैसे भरून वीज वापरण्याची आर्थिक क्षमता नाही. पोस्टपेड बिलामध्ये वीज देयके भरण्यासाठी ग्राहकांना काही दिवसांचा अवधी तरी मिळतो. या दरम्यान त्यांना बिल भरण्यासाठी पैशाची तरतूद करता येते. मात्र प्रीपेड मीटरमध्ये अशा सर्वसामान्य ग्राहकांकडे प्रीपेड मीटर रिचार्ज करण्यासाठी पैसे उपलब्ध नसतात त्यांना वीजपुरवठा होणार नाही. रात्री अपरात्री प्रीपेड मीटरचा रिचार्ज संपल्यास अंधारात बसण्याची वेळ नागरिकांवर येईल. अशा प्रकारच्या अनेक समस्या प्रीपेड मीटरमुळे निर्माण होणार आहेत. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे जे काम महावितरणने सुरू केले आहे, ते ग्राहक हितासाठी
तात्काळ थांबवण्याची मागणी माजी आमदार संदीप नाईक यांनी केली आहे. जनभावनेची दखल न घेता जर हे काम सुरूच ठेवले तर मात्र नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही संदीप नाईक यांनी दिला आहे.

Previous Post

महापालिका कर्मचाऱ्यांच्या पीएफबाबतचे प्रश्न मार्गी

Next Post

नेरूळ पश्चिम परिसरातील अनधिकृत बॅनर व होर्डींग हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

नेरूळ पश्चिम परिसरातील अनधिकृत बॅनर व होर्डींग हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठांच्या हस्ते ध्वजारोहण

सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठांच्या हस्ते ध्वजारोहण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com