स्वयंम न्युज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील महापालिकेच्या सिताराम मास्तर उद्यानात सानपाडा ज्येष्ठ नागरिक ग्रुप 7-05, व सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी सकाळी ७.३० वाजता ज्येष्ठ नागरिक, महिला विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. कदम, प्रमुख पाहुणे विभागातील समाजसेवक पांडुरंग आमले, 7-05 गार्डन ग्रुपचे धांद्रे साहेब निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर हस्ते भारत मातेच पुजन, ध्वजवंदन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी तिरंगी झेंड्याला अभिवादन केले. सामूहिक राष्ट्रगीत गायले गेले. या कार्यक्रमास विभागातील पुरुष, महिला बहुसंख्येने उपस्थित होते त्यावेळी प्रमुख वक्त्यामध्ये खजिनदार विष्णुदास मुखेकर व श्रीमती विजया गोसावी उपाध्यक्ष व वरिष्ठ नागरिक बी. बी. खरात यांचे यांचे देश भक्तिचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे पांडुरंग आमले यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. न. कदम यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले या कार्यक्रमानंतर संघाच्या कार्यालयात उपस्थितांना चहा अल्पोहार वाटण्यात आला. त्या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांपैकी काही महिला व पुरुष यांनी देशभक्तीपर गीते सादर केली काही ज्येष्ठ सभासदांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद केले. कार्यक्रम एकदम शांततेत व्यवस्थित संपन्न झाल्याबद्दल संघाचे सचिव शरद पाटील यांनी सर्वांना धन्यवाद दिले.