नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील पथदिवे अनधिकृत बॅनर व होर्डींगच्या विळख्यातून मुक्त करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पश्चिम परिसर हा पूर्णपणे अनधिकृत बॅनर व होर्डींगच्या विळख्यात अडकलेला असून महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. नेरूळ सेक्टर सहा ते चोवीस वजरानी स्पोर्टस क्लबपर्यत जाणारा अंर्तगत रस्ता आपणास दोन्ही बाजूला अनधिकृत बॅनर व होर्डीग लागलेले दिसतात. या मार्गावर सेक्टर सहामध्ये तर पथदिव्यावर बिल्डरांच्या छोटेखानी होर्डींगनी अतिक्रमण केलेले असून ते होर्डींग येथे गेल्या काही महिन्यापासून लागलेले आहेत. नेरूळ सेक्टर सहामधील समाजमंदीराचा चौक व अंर्तगत भागातही अनधिकृत बॅनर व होर्डीग नेहमीच लागलेले असतात. नेरूळ सेक्टर सहामध्ये शिरताना चार व सहा चौकातच सहाच्या बाजूला सीव्ह्यू उद्यानाच्या बाजूला फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. नेरूळमधील अनेक ठिकाणच्या पदपथावर अनधिकृतरित्या अतिक्रमण केले आहे. अनधिकृत बॅनर व होर्डींगवर कारवाईस पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. नेरूळ सेक्टर सहा परिसरात लागलेले अनधिकृत बॅनर तसेच पालिकेच्या पथदिव्यावर बिल्डरांचे लटकत असलेले अनधिकृत छोटेखानी होर्डीग्ज हटवून परिसराचा बकालपणा घालविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.