जयेश खांडगेपाटील : [Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चारमधील सिडको वसाहतीमधील महापालिका उद्यानातील ओपन जीममधील तुटलेल्या व्यायामाच्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर चार परिसरात महापालिकेच्या शाळेच्या समोरच महापालिकेचे क्रिडांगण व उद्यान आहे. हे क्रिडांगण व उद्यान पूर्णपणे परिसरातील सिडको वसाहतीच्या मध्यभागी आहे. या उद्यानामध्ये स्थानिक रहिवाशी सकाळी व सांयकाळी चालण्यासाठी तसेच तेथील ओपन जीममध्ये व्यायामासाठी येत असतात, या उद्यानामधील ओपन जीममधील व्यायामाचे साहित्य तुटले असल्याने स्थानिक रहिवाशांना व्यायाम करता येत नाही. स्थानिक रहीवाशांची ही होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी संबंधितांना तातडीने ओपनी जीममधील तुटलेल्या व्यायामाच्या साहित्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देवून स्थानिकांना दिलासा देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.