सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : 8369924646
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील एलआयजी सोसायटीतील गटारावरील तुटलेल्या झाकणांची तातडीने डागडूजी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी एका निवेदनातून महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर दोन परिसरात एलआयजी वसाहत असून या वसाहतीमध्ये दुर्गा माता मंदीर आहे. या मंदिराजवळच गटारावरील सिमेंटची झाकणे तुटलेली आहेत. त्या तुटलेल्या झाकणाचा चालताना अंदाज न आल्याने तसेच रात्रीच्या वेळी अंधारात न दिसल्याने स्थानिक रहीवाशी येथे पडून त्यांना शारीरिक जखमाही झालेल्या आहेत. गेली तीन दिवस सलग तीन मुले या गटारात पडल्याने त्यांनाही जखमा झाल्या आहेत. या गटाराचे आता वर्षभरापूर्वीच काम झालेले आहे. तरी आपण समस्येचे गांभीर्य वगळता या ठिकाणी गटारावरील तुटलेली झाकणे तातडीने बदली करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.