सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com :८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची दुरुस्ती करंण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर सहा येथील प्रभाग ८५ चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने दीड वर्षापूर्वीच नव्याने खेळणी बसविली आहेत. या खेळण्यातील एक झोका तुटला असून दुसऱ्या खेळण्यातील एका बाजूचा कोपरा गळून पडला आहे. सध्या मुलांच्या परिक्षा संपल्या असून लहान मुले खेळण्यासाठी उद्यानात येत असतात. तुटलेला झोपाळा व एका खेळण्याचा एका बाजूचा गळून पडलेला भाग याची तातडीने दुरुस्ती करण्याचे संबंधितांना देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.