अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आपल्या मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेतील कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजताच कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. तीन तास झाले तरी आंदोलन सुरुच असल्याने आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहून अखेरीला कचरा वाहतूकीशी संबंधित एजी कंपनीच्या संचालकांनी, व्यवस्थापनाने आंदोलनस्थळी धाव घेत कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरुन कमी न करण्याचे आश्वासन दिले व शनिवारी बैठक घेऊन इतर समस्यांचे निवारण करण्याचे मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही जुन्या कर्मचाऱ्यांना कामावर काढू नये, नाका कर्मचाऱ्यांना कामावर घ्या, कचरा वेचक छोट्या वाहनावर दोन कर्मचारी ठेवावे, एकटा वाहनचालक काम करणार नाही, यासह इतर मागण्यासाठी कर्मचाऱ्यांन पहाटे पाच वाजताच आंदोलन सुरु केले होते. कामगार नेते रविंद्र सावंतही या आंदोलनात पहाटेपासून सहभागी झाले होते. कर्मचारी कचरा वाहतुक काम करत नसल्याचे पाहून एजी कंपनीचे संचालक व व्यवस्थापक आंदोलनस्थळी आले. त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.