• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 26, 2025

वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४-५ वरील धोकादायक इमारत पाडा : संदीप खांडगेपाटील

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिकेची वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४ व ५ वरील धोकादायक इमारत पाडण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला तातडीने निर्देश देण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४ व ५ वर महापालिका प्रशासनानेच इमारतीचे बांधकाम केले असून ही इमारत महापालिका प्रशासनाच्या मालकीची आहे. ही इमारत सध्या जिर्ण अवस्थेत असून आयआयटीने ही इमारत धोकादायक घोषित केलेली आहे. या इमारतीच्या निर्मितीपासून सर्व काही संशयास्पद प्रकार असल्याने याची प्रशासकीय पातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे. ही इमारत कशासाठी बांधण्यात आली? या इमारतीवर आतापर्यत पालिका प्रशासनाचा किती निधी खर्च झाला आहे? ही इमारत बांधण्यासाठी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे? या इमारतीच्या सदोष बांधकामाला व अल्पावधीतच इमारत जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत जाण्याला कोण जबाबदार आहे? यामध्ये पालिकेचे कोणकोणते अधिकारी दोषी आहेत?  इमारत धोकादायक अवस्थेत असतानाही ती इमारत पाडण्यास टाळाटाळ का केली जात आहे? इमारत बांधकामप्रकरणास व धोकादायक होण्यास तसेच धोकादायक असूनही पाडण्यास विलंब करण्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईस का चालढकल केली जात आहे, या सर्वांची प्रशासकीय पातळीवर चौकशी होऊन नवी मुंबईकरांना सर्व माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. इमारतीची सध्याची अवस्था पाहता मुसळधार पावसात ती कधीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे जिवितहानी व्यापक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. इमारत पडल्यास व त्यात जिवितहानी झाल्यास त्यास कोण जबाबदार असणार आहे? याचेही महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना लेखी स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. आपण संबंधितांना ही महापालिकेच्या मालकीची धोकादायक इमारत पाडण्याचे संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

संदीप खांडगेपाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ नगरविकासचे सेक्रेटरी डॉ. गोविंद राज यांच्याकडे तर महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी संबंधित उपायुक्तांकडे तर उपायुक्तांनी वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविले आहे.

Previous Post

अपघातग्रस्त कर्मचाऱ्यांचा खर्च महापालिकेने करण्याची मागणी

Next Post

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

Next Post
सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्याचे पालिका आयु्क्तांचे आश्वासन

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com