• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2025

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘इंडिया रेटींग अँड रिसर्च’ (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचे पत मानांकन जाहीर करण्यात येते. यामध्ये मागील १० वर्षांप्रमाणेच याही वर्षी ‘इंडिया डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)’ हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महापालिकेस २०२४-२५ करीता जाहीर झाले असून अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने अकरा वर्षे मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महापालिका आहे.
देशातील निवासयोग्य शहरांमध्ये आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे. महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिले आहे. जमा-खर्चाचा योग्य ताळमेळ राखण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण लेखा विभागाची सुयोग्य साथ लाभत आहे. त्यामुळेच हे सर्वोत्तम आर्थिक पत मानांकन याही वर्षी लाभले आहे. अशाप्रकारे सातत्याने पत मानांकन मिळविणे ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मागील आर्थिक वर्षात कर वसूलीची चांगली कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम राहिलेली आहे. या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणारी ‘मालमत्ताकर अभय योजना’ प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मालमत्ताकर विभागाने आत्तापर्यंतचे सर्वोच्च २६ कोटीहून अधिक करवसूली केली. इतरही विभागांनी त्यांचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. विविध करांद्वारे प्राप्त होणाऱ्या निधीमधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ तसेच माझी वसुंधरा अभियान यामध्येही नवी मुंबई महापालिकेने उत्तम कामगिरीचे सातत्य राखले आहे.
महापालिका आयुक्तांमार्फत महापालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि नागरी सुविधांच्या योग्य बाबींवरच खर्च असे सुयोग्य धोरण अवलंबिल्याने तसेच ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करीत ई ऑफिस कार्यप्रणाली राबविल्याने कामकाजात गतिमानतेसोबतच पारदर्शकता आलेली आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली आहेच शिवाय कामकाजही पेपरलेस व गतीमान झाले आहे. कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.
या साऱ्यांचे फलित म्हणजे हे पत मानांकन असून यापुढील काळातही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च ही पध्दत कायम राखली जाणार आहे. त्यामुळे ‘इंडिया रेटींग अँड रिसर्च’ या नामांकीत संस्थेमार्फत ‘इंडिया AA+ Stable’ हे सातत्याने अकराव्या वर्षी लाभलेले पत मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज आहे.

Previous Post

श्रीसदस्यांसह नागरिकांच्या सहभागातून सायन पनवेल महामार्गावर स्वच्छता मोहीम

Next Post

नेरूळमधील दूषित पाणीपुरवठा समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे येणारे पिवळसर दूषित पाणी थांबवा : जीवन गव्हाणे

नेरूळमधील दूषित पाणीपुरवठा समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

जुन्नर तालुक्यात बिबट्यांसह चोरांचा धुमाकूळ

जुन्नर तालुक्यात बिबट्यांसह चोरांचा धुमाकूळ

घनकचरा विभागातील कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांसाठीचे आरोग्य शिबिर उत्साहात

घनकचरा विभागातील कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांसाठीचे आरोग्य शिबिर उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com