जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेकडून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करुन त्यावर तोडगा काढण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे प्रभाग ८६ चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात अनेक दिवसापासून दूषित पाणीपुरवठा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सुरु असलेला पावसाळा, जलवाहिन्यांची सतत होत असलेली कामे यामुळे सुरुवातीला गढूळ पाणी, तांबूस, पिवळसर पाणी येत असल्याचा समज होता. परंतु दूषित पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून असून दूषित पाण्यामुळे नेरूळ सेक्टर सहामधील रहिवाशी पोटदुखीच्या आजाराने त्रस्त झाले आहे. तरी समस्येचे गांभीर्य पाहता दूषित पाण्याच्या समस्येवर तोडगा काढून नेरूळ सेक्टर सहामधील रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



