जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २,३,७,८ मध्ये डासांच्या वाढत्या त्रासाची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी सोसायटीच्या बाह्य व अंर्तगत भागात धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी भाजयुमोचे नवी मुंबई माजी जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी युनियनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरामध्ये डासांच्या त्रासाने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. सांयकाळच्या वेळी घराची दारे-खिडक्या बंद करुन घेण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. डासांमुळे साथीच्या आजाराचा उद्रेक झाला असून मलेरिया, डेंग्यू आजाराने स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले आहेत. डासांचे नियत्रंण न झाल्यास व ही समस्या निकाली न निघाल्यास साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासनाने सानपाडा सेक्टर २,३,७,८ परिसरामध्ये अंर्तगत व बाह्य रस्त्यावर तसेच सोसायटीच्या अंर्तगत व बाह्य भागात धुरीकरण अभियान तातडीने राबवून स्थानिक रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



