• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 4, 2025

प्रभागातील चोरांचा, गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभागातील चोरांचा, गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८, १८ए परिसरातील रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनातील साहित्य चोरी करणाऱ्या चोरांचा तसेच परिसरात मोकळ्या इमारतींमध्ये ठाण मांडून बसणाऱ्या गर्दुल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपाचे माजी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी गणेश भगत यांनी नेरूळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८, १८एमध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनातील एसी कॉम्प्रेसर व अन्य किंमती साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाहनांचे दरवाजे अथवा काचा फोडून आतील साहित्य चोरीला जात आहे. यामुळे परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपण या परिसरात साध्या वेशातील पोलिस गस्त तातडीने वाढवून या चोऱ्या करणाऱ्या चोरांचा शोध लावून स्थानिक नागरिकांना दिलासा देण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.

नेरूळ सेक्टर १६ एमधील त्रिमूर्ती भवन या इमारतीचा ताबा पूर्णपणे महापालिका प्रशासनाकडे आहे. ही इमारत आजमितीला पूर्णपणे बंद असून तेथील सदनिकांमध्ये कोणीही निवासी वास्तव्य करत नाही. तथापि रहीवाशांनी सदनिका सोडल्यापासून या इमारतीचा ताबा नशेडी, गर्दुले व अन्य व्यसने करणाऱ्यांनी घेतला आहे. २४ तास हे घटक सोसायटी आवारात असतात. ही इमारत पूर्णपणे नागरी वस्तीत असल्याने इमारतीसभोवतालच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण तातडीने या समस्येवर तोडगा काढताना इमारतीची गर्दुले, नशेडीच्या विळख्यातून मुक्तता करण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.

Previous Post

पत्रकारांचे नेरूळ येथील हक्काचे पत्रकार भवन कार्यान्वित करा

Next Post

परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post
परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी

परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची राष्ट्रवादीची मागणी

सानपाड्यात रविवारी अवतरणार पंढरीची वारी

कुकशेतमध्ये रविवारी रंगणार भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा

कुकशेतमध्ये रविवारी रंगणार भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com