नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमाच्या २२ क्रमाकांच्या बसेसची संख्या वाढविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी निवेदनातून केली आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाची २२ क्रमाकांची बस वाशी सेक्टर ७ येथील डेपो ते खारघर जलवायूदरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. मुळात या क्रमाकांच्या बसेसची संख्या कमी असून आहे त्या बसेसही वेळेवर येत नसल्याचा याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. कित्येक वेळा वाट पाहूनही बसेस ४० ते ५० मिनिटे न आल्याने प्रवाशांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी या बसच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. विभागाला २२ क्रमाकांची बससेवा वेळेवर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.



