• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 5, 2025

मंत्री नितेश राणे यांनी पायीवारीत घेतली चैत्यज्ञाची अनुभुती!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मंत्री नितेश राणे यांनी पायीवारीत घेतली चैत्यज्ञाची अनुभुती!

 

पुणे  : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवारी वाखरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी वारीत सहभागी होत पायी वारी केली. यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेतले तसेच रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी खांद्यावर घेत मंत्री नितेश राणे यांनी पायीवारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांबरोबर चैत्यज्ञाची अनुभुती घेतली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विविध भागातून वारकरी भक्ती भावाने सहभागी होत असतात.
पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले हे भक्तगण वारीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग चरणी लीन होतात. अशा या भक्तीमय वातावरणात या पायी दिंडीत मंत्री नितेश राणे सहभागी झाल्याने वारकऱ्यांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वारकऱ्यांच्या वतीने मंत्री नीतेश राणे यांचा सत्कारही करण्यात आला.

वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा!
आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली ‘आषाढी वारी’ महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावात आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ च्या जयघोषात लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला येत असतात. हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे. आज सोलापूर, वाखरी येथे वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्व वारकरी बांधवांचा प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळाली. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र क्षणांनी मनात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. असा अनुभव एक्सवर मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

कुकशेतमध्ये रविवारी रंगणार भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा

Next Post

विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सिंधुदुर्गला मोठ्या निधीची नितांत गरज

Next Post
विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सिंधुदुर्गला मोठ्या निधीची नितांत गरज

विजेचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सिंधुदुर्गला मोठ्या निधीची नितांत गरज

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहा परिसराची बकालपणातून मुक्तता करा : संदीप खांडगेपाटील

सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सानपाड्यातील रेल्वे स्टेशनाबाहेरील फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com