• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2025

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न पुतळ्याचे अनावरण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न पुतळ्याचे अनावरण

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, माजी महापौर सुधाकर सोनवणे व जयवंत सुतार, माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी विरोधी पक्ष नेते नामदेव भगत, डॉ. राजेश पाटील, सिद्राम ओव्हाळ, महेश खरे, रविंद्र सावंत, शशिकला जाधव तसेच इतर माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेरुळ सेक्टर २६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे स्थळ पर्यटकांचे नवी मुंबईतील आकर्षण केंद्र म्हणून सुपरिचीत असून या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मागणीनुसार व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार २.८० मीटर उंचीचा भगवान गौतम बुध्द यांचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. तेथील दर्शनी भागात ध्यानमग्न मुद्रेत असलेल्या पुतळ्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात व लौकिकात लक्षणीय भर पडलेली आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करताना वन मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई हे भगवान गौतम बुध्दांच्या पंचतत्वांची अंमलबजावणी करणारे शांतताप्रिय शहर असल्याचा विशेष उल्लेख करीत गौतम बुध्दांच्या पुतळ्यामुळे या परिसराला तेजस्विता प्राप्त झाली असल्याचे सांगितले. नवी मुंबई शहरामध्ये सर्व सुविधांच्या गुणवत्तापूर्ण पूर्ततेसोबतच सांस्कृतिक शहर म्हणून विकास व्हावा यादृष्टीने केल्या जात असलेल्या अशा कामांबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे यांनी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद व्यक्त केला. जगातील लोकांना युध्द नको तर शांतीचा संदेश देणारा बुध्द हवा अशा शब्दात बुध्द विचारांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. या ठिकाणाला भेट देणारे नागरिक शांती आणि समाधानाचा संदेश घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा विशेष उल्लेख केला. आगामी काळात नवी मुंबईत संविधान शिल्प व भवन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयएएस अभ्यासिका सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबईत शहरात नागरिकांना आनंद देणाऱ्या, समाजस्वास्थ्य वाढविणाऱ्या गोष्टी करण्यावरही महापालिका भर देत असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्याचाच एक भाग म्हणून ज्वेल ऑफ नवी मुंबई सारख्या नागरिकांच्या आवडत्या ठिकाणी विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या व मानवजातीला प्रेरक विचारांनी भारून टाकणाऱ्या भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा उभारण्यात आला असल्याचे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना सांगितले. जगाला सम्यक तत्वज्ञान देत मानवजातीला भारून टाकणाऱ्या भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यामधून सर्वजण आंतरिक शांतीचा संदेश घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील धारण तलावाचे पुनरूज्जीवन करून या परिसराला आणखी आकर्षक बनविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पुतळा स्थापन करण्यासाठी योगदान देणारे शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता सुनिल कोकाटे, पुतळ्याचे शिल्पकार प्रदीप शिंदे तसेच संबंधित व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. भन्ते प्रज्ञानंद यांनी वंदना सादर करून प्रारंभ केला. महिलांच्या लेझीम पथकाने सादरीकरण करीत या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्वेल ऑफ नवी मुंबई या विस्तृत आकाराच्या उपवनामधील मोठ्या पॅसेजमध्ये मध्यभागी डायमंडची प्रतिकृती असून त्याच्या दोन्ही बाजूस जीने बनवून मध्यभागी उंच चबुतऱ्यावर भगवान गौतम बुद्ध यांचा २.८० मीटर उंचीचा ध्यानमग्न भव्य पुतळा स्थापित करण्यात आलेला आहे. या पुतळ्यामुळे आधीच आकर्षक असलेल्या या परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडलेली असून त्यासोबत सामाजिक शांती व मानवतेच्या संदेशाचेही प्रसारण होत आहे.

Previous Post

अनधिकृत बॅनरवरील कारवाईचा अहवाल मागवण्याची मागणी

Next Post

‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम

Next Post
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम

‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम

भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत

भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com