• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2025

‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानामध्ये रेड स्पॉट स्वच्छता मोहीम

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भिंती, पदपथ यांच्या कॉर्नरवर थुंकण्याच्या नागरिकांच्या सवयींमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्याकडेही व नागरिकांना या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये आज रेड स्पॉट निर्मूलन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या अभियानामध्ये दररोज वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे व स्मिता काळे आणि परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ उपआयुक्त संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी यांच्या वतीने विशेषत्वाने रेल्वे स्टेशन परिसर व सार्वजनिक जागी रेड स्पॉट स्वच्छता मोहीमा नागरिकांच्या उत्साही सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आल्या.

यामध्ये ठिकठिकाणी ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानाचे पोस्टर्स दाखवून नागरिकांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कुठेही न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच तशा प्रकारच्या रेड स्पॉटची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या अंतर्गत नेरुळ विभागात बसडेपो ते रेल्वे स्टेशन परिसरातील रेड स्पॉटची पाणी मारून सफाई करण्यात आली. सहा. आयुक्त जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

तुर्भे विभागातही सेक्टर २६ कोपरी परिसर आणि जनता मार्केट परिसरात सहा. आयुक्त सागर मोरे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली रेड स्पॉट स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त भरत धांडे व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली रेड स्पॉट स्वच्छता मोहीम नागरिकांच्या सहयोगातून करण्यात आली.

घणसोली विभागातही सहा. आयुक्त उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी विजय पडघन यांच्या माध्यमातून घणसोली रेल्वे स्टेशन परिसर, रिक्षा स्टँड, पानटपरी याठिकाणी सेक्टर १ ते ३ परिसरातील रेड स्पॉटवर स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.

Previous Post

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न पुतळ्याचे अनावरण

Next Post

भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत

Next Post
भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत

भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

विघ्नहर’ कारखान्याचे मील रोलर पुजन उत्साहात

विघ्नहर’ कारखान्याचे मील रोलर पुजन उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com