• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 27, 2025

राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांचा १८वा पुण्यस्मरणदिन साजरा

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांचा १८वा पुण्यस्मरणदिन साजरा

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नारायणगाव : राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांच्या १८ व्या पुण्यस्मरणदिनाचे आयोजन हलगी सम्राट केरबा पाटील संस्था, महा-ई-सेवा केंद्र, आणि द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या विद्यमाने फुलसुंदर मार्केट नारायणगाव येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, ‘तमाशा कलाक्षेत्रात केरबा पाटील यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगला. त्यामुळेच त्यांचे नाव तमाशा कला क्षेत्रात नावलौकिक आजरावर आहे. त्यांचे शालेय शिक्षण कमी होते. पण ते हलगी कलेच्या शिक्षणात पारंगत होते. हलगी वाद्याच्या छंदाने त्यांचे शालेय शिक्षण कमी झाले. पण त्यांनी त्यांचे भाऊ, मुले, नातवंडे यांना शिक्षण क्षेत्रात अग्रेसर केले’.

‘कला आणि शिक्षण हे माणसाला नावलौकिक मिळवून देतात. त्याचे उत्तम उदाहरण राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील बस्तीसावरगावकर हे आहेत. त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन त्यांचा मुलगा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शासन समाजभूषण पुरस्कार्थी  काशिनाथ आल्हाट सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. या निमित्ताने ज्येष्ठ तमाशा व्यवस्थापक बबन दळवी, श्रीमती गायत्रीताई बेल्हेकर, वनकर्मचारी अनिल शिंदे, सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख दादाभाऊ आल्हाट या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र शेगर, अष्टपैलू कलाकार राजेश खोल्लम, तमाशा फड मालक संजय महाडिक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कदम, नारायणगावचे ज्येष्ठ नागरिक अरुण वाव्हळ, महा ई सेवा केंद्राचे प्रमुख ज्ञानेश्वर बेनके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी केले. तर आभार द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अथर्व खांडगे यांनी मानले .

या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील २५ कलाकारांचे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचे ऑनलाइन फॉर्म फुलसुंदर मार्केट महा ई सेवा केंद्र नारायणगाव येथे भरून घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रविण खुडे, नवनाथ आल्हाट आणि महा-ई-सेवा केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री  नितेश राणे यांचा जोरदार दणका

Next Post

नेरुळ गावठाणात शिवसेनेच्या पुढाकाराने स्वच्छतेचा झंझावात

Next Post
नेरुळ गावठाणात शिवसेनेच्या पुढाकाराने स्वच्छतेचा झंझावात

नेरुळ गावठाणात शिवसेनेच्या पुढाकाराने स्वच्छतेचा झंझावात

प्रभाग ९६ मध्ये मूषक नियत्रंण मोहीम राबवण्याची भाजपची मागणी

सानपाड्यात मूषक नियत्रंण अभियान राबविण्याची भाजपाची मागणी

सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

सावरगावात नेत्रचिकित्सा शिबीर उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com