सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शिवसेनेच्या माध्यमातून नेरूळ गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावात असलेला कचरा, बकालपणा व अन्य नागरी समस्या छायाचित्राच्या माध्यमातून उघड झाल्या.
शिवसेना उपशहर प्रमुख नवी मुंबई कलपेश पाटील यांच्या पुढाकाराने भावेश गुरुनाथ पाटील यांच्या संकल्पनेतुन व शाखाप्रमुख संदीप सुरवे काका, उपविभागप्रमुख दीपक लांडगे, तसेच युवा सैनिक अमरदास मुंढे यांच्यासह अमर सिंग, अमोल लांडगे, संदीप बागडे, ओमी राणा, निहार, संजय सोनकांबळे, कमलेश पाटील, निनाद कदम, अजय पाटील, सुखीर कोळी, रोशन शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेऊन ‘स्वच्छ परिसर अभियान’राबविताना नेरुळ गावठाण टप्पा स्वच्छ करण्याची मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. गावठाणात वर्षानुवर्षे साचलेली घाण आणि अडगळीच्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. खिडकीतून कचरा टाकू नका, हा संदेश गावपातळीवर पोहचवण्यात आला.



