नवी मुंबई : नेरूळ, सारसोळे गाव सेक्टर सहा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महापालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचे वाटप माजी नगरसेविका सुजाता पाटील व जयश्री ठाकूर तसेच सारसोळे ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केल्याबाबत सुजाता पाटील यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानता विद्यार्थ्यंना सुखदायी भविष्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
यावेळी भाजपा पदाधिकारी हितेश गामी, परशुराम मेहेर, यशवंत तांडेल, चंद्रकांत वैती, नारायण मेहेर, कुशल मढवी, रवी मेहेर, रुपेश तांडेल व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



