नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सेसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात पार पडले. सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक कृष्णा शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये सोसायटीचे अध्यक्ष दिगंबर गांवकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करताना सोसायटीतील नागरिकांना एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन केले. सोसायटीमध्ये सध्या सुरु असलेल्या पुर्नविकास प्रक्रियेचा आढावा घेताना कोणतेही मतभेद न ठेवता चर्चा, विचारविनिमयाने प्रत्येकाने सहकार्य करावे, माहिती जाणून घ्यावे, सुसंवाद ठेवावा, अशा सूचना उपस्थितांना केल्या.
सोसायटीचे पदाधिकारी सोपान सावंत यांनी लोकशाही प्रक्रियेत जागरुकता नसल्याने व लोकांमध्ये सक्रियतेबाबतची उदासिनता असल्याने चुकीचे लोक निवडून येत असल्याबाबतची खंत व्यक्त केली. सोसायटीच्या पदाधिकारी सौ. सुवर्णा खांडगेपाटील यांनी सोसायटीच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्व सांगताना सोसायटीच्या पुर्नविकासात समन्वय व सुसंवादाची आवश्यकता महत्वाचा घटक ठरत असल्याचे सांगितले. सोसायटीतील रहिवाशी किशोर (दादा) तांबे यांनी इमारत पुर्नविकासात जाणार असल्याने सोसायटी आवारात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सोसायटीतील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सोसायटीतील लहान मुलांनी देशभक्तिपर नृत्य सादर केले व भाषण केले.
यावेळी व्यासपिठावर सोसायटीचे सचिव बादशहा अत्तार, खजिनदार प्रकाश जोशी पदाधिकारी सतीश लाड, प्रशांत गमरे, सुहास घाडगे, अभिमन्यू उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



