स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिपावलीनिमित्त नेरूळ-जुईनगरमधील प्रभाग क्रं २२ मधील रहिवाशांसाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांच्यावतीने गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरदरम्यान रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग २२ मधील रहिवाशांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नावनोंदणी करता येईल. स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्यांची रांगोळी जनजागृती तसेच समाजप्रबोधनात्मक हवी, महिलांवरील वाढते अत्याचार, वाढती महागाई, बेरोजगारी, पर्यावरण अशा विषयांवर रांगोळी हवी. ९७०२६०५३२१ या व्हॉटसअप क्रमाकांवर रांगोळीचे छायाचित्र पाठविण्यात यावे. सोबत रांगोळी बनवितानाचा व्हिडिओ पाठविणे आवश्यक आहे. रांगोळी स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक, गॅस शेगडीचे दुसरे बक्षिस, कुकरचे तिसरे बक्षिस याशिवाय सहभागी होणाऱ्या सर्वांनाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय गडकिल्ले बनविणाऱ्या सर्वोत्कृष्ट तीन संघाना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. सहभागी सर्वच संघांना बक्षिसाने गौरविण्यात येणार आहे. ९७०२६०५३२१, ९८९२०२७३७३८, ८६५२५६९८५६ या क्रमाकांवर स्पर्धेसाठी नावनोंदणी करुन प्रभाग २२ मधील रहिवाशांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेच्या आयोजिका व कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी केले आहे.



