• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 19, 2025

शेलघर येथे मंगळवारी `दिवाळी पहाट’!

adminbyadmin
in रायगड
0
शेलघर येथे मंगळवारी `दिवाळी पहाट’!

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

उरण :  सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी `दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी उलवा नोडमध्ये सर्वप्रथम सुरुवात केली. ही परंपरा जपण्यासाठीच ‘यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था’ आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शेलघर येथे `दिवाळी पहाट’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी (ता. २१) सकाळी सात वाजता होणार आहे.
‘इंडियन आयडाल’ सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ रंगणार आहे. विशेष म्हणजे `लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, `दिवाळी पहाट’ कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद होणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी युनियनची पत्रकार परिषद ही १९९० पासूनची प्रथा आहे. या पत्रकार परिषदेत कामगारांसाठी वर्षभरात केलेले करार आणि विविध कंपन्यांमधील बोनसचा आढावा घेतला जातो. तसेच पत्रकार बांधवांनी आपापल्या वृत्तपत्रांत दिलेल्या बातम्यांबद्दल धन्यवाद मानले जातात. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्याही दिवाळी मिठाई देऊन गोड केली जाते. यावेळी दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा जपण्यासाठीच यंदा पहिल्यांदाच ‘सुखकर्ता’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार आहे. हा दिवाळी अंक `कैलास मानसरोवर’ या विषयाला वाहिलेला आहे. दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा करणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी अवलिया आहेत. त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेचे महत्त्व, त्यांचे अनुभव, तसेच इतरही ज्यांनी कैलास मानसरोवर यात्रा केली आहे, त्यांच्या अनुभवाची शिदोरी वाचकांना देण्याचा प्रयत्न `सुखकर्ता’ या दिवाळी अंकातून करण्यात आला आहे.  शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहाच्या हिरवळीवर हे कार्यक्रम रंगणार आहेत.  
शेलघर येथील `यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थे’ची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी असल्याने रसिकांनी आणि पत्रकार बांधवांनी या सामाजिक चळवळीचा वसा जपण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महेंद्रशेठ घरत आणि सौ. शुभांगीताई घरत यांनी केले आहे.

Previous Post

कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ-जुईनगरमध्ये गडकिल्ले व रांगोळी स्पर्धा

Next Post

भाजपच्या पाठपुराव्यामुळे सानपाड्यातील रस्ते, कचरा समस्येचे निवारण

Next Post
भाजपच्या पाठपुराव्यामुळे सानपाड्यातील रस्ते, कचरा समस्येचे निवारण

भाजपच्या पाठपुराव्यामुळे सानपाड्यातील रस्ते, कचरा समस्येचे निवारण

कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा! : ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे

कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा! : ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता : महेंद्रशेठ घरत

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता : महेंद्रशेठ घरत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com