• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 18, 2025

नवी मुंबई मेट्रोने पहिल्या २ वर्षांत गाठला १ कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई मेट्रोने पहिल्या २ वर्षांत गाठला १ कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

 सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर वरील मेट्रो सेवेने सुरू झाल्यापासून ते आजतागायत या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये प्रवासी संख्येचा १,१५,२८,२९७ इतका टप्पा गाठला आहे. सिडको मेट्रोच्या या देदीप्यमान यशाकरिता सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मेट्रोच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याकरिता नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला असून १७ नोव्हेंबर २०२३ पासून या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. मेट्रोची सेवा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते  १२ जानेवारी २०२४ रोजी देशाला समर्पित करण्यात आली. या मेट्रो सेवेमुळे सीबीडी बेलापूर, खारघर आणि तळोजा परिसराला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे.   

मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम करण्याकरिता सिडकोतर्फे वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करण्यात येऊन सध्या गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी बेलापूर व तळोजा स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांना मेट्रोच्या फेऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित वेळांमध्ये दर पंधरा मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध आहे. मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात येऊन सध्या तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० इतका आहे. या प्रवासीस्नेही सुधारणांमुळे सदर मार्गावरील मेट्रो सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मेट्रोच्या प्रवासी संख्येचा एक कोटीहून अधिक टप्पा गाठणे शक्य झाले आहे.

मेट्रो मार्ग क्र. १ चा विस्तार बेलापूरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच १६ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग क्र. २ पेंधर ते तळोजा एमआयडीसी दरम्यान नियोजित असून कळंबोली आणि कामोठे मार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत या मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.

 

“मागील दोन वर्षांच्या कालावधीत मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येने गाठलेला एक कोटींहून अधिक आकडा हा मेट्रो सेवेला लाभत असलेला प्रवाशांच्या उदंड प्रतिसादाचे प्रतीक आहे. या मेट्रो मार्गामुळे बेलापूर, खारघर व तळोजा परिसरातील कार्यालये, गृहसंकुले व उद्योग-व्यवसाय यांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी लाभली आहे. नवी मुंबईकरांनी सिडकोच्या मेट्रो सेवेप्रति दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.”

विजय सिंघल

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Previous Post

भुमिपुत्रांच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना मतदार धडा शिकविणार : महेंद्र घरत

Next Post

संदीप नाईकांच्या राजकीय भूमिकेवर महापालिका निवडणुकीची समीकरणे ठरणार?

Next Post
मालमत्ता करासह पाणीपट्टीत वाढ न करण्याची संदीप नाईक यांची मागणी

संदीप नाईकांच्या राजकीय भूमिकेवर महापालिका निवडणुकीची समीकरणे ठरणार?

परिवहन उपक्रमाच्या बसेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची समन्वय समिती जाहिर

ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा भाजपकडून सत्कार

ज्येष्ठ नागरिक संघ – सानपाडा विरंगुळा केंद्रातील विजयी उमेदवारांचा भाजपकडून सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com