नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाकडून समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. कामगार नेते नवी मुंबई इंटक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या समन्वय समितीमध्ये नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षा पूनम पाटील, नवी मुंबई महापालिकेत सलग चार वेळा निवडून आलेले नगरसेवक संतोष शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस गुरुबिंदर सिंग बच्छेर, प्रदेश कॉंग्रेसचे सचिव आनंद सिंह, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक, प्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते रविंद्र सावंत, कॉंग्रेस नेत्या निला लिमये यांचा समावेश आहे. या समितीच्या समन्वयकपदाची जबाबदारी संतोष शेट्टी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
गेली काही वर्षे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या रविंद्र सावंत यांना संघटनात्मक पातळीवर बढती मिळाली असून प्रदेश कॉंग्रेसमध्ये त्यांची वरिष्ठ प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या गेल्या सभागृहात कॉंग्रेसचे दहा नगरसेवक होते. त्यातील पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये व चार नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्षा पूनम पाटील या कॉंग्रेस पक्षातील गेल्या सभागृहातील एकमेव नगरसेविका पक्षात आहेत. काही दिवसापूर्वी जाहीर झालेल्या नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणीमध्ये रविंद्र सावंत यांचा समावेश नसल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. पक्षाबाहेरील राजकीय शक्ती जाणिवपूर्वक रविंद्र सावंत यांचे खच्चीकरण करत असल्याचा संतापही कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला होता. पण आता त्यांची थेट प्रदेश कॉंग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कमिटीच्या वरिष्ठ प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.