नवी मुंबई :- नवी मुंबई कार्यक्षेत्रात सारसोळेच्या ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेला बामनदेव गेल्या काही वर्षात चांगलाच नावारूपाला येवू लागला आहे. गेली ७ वर्षे सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागामध्ये महाशिवरात्री दिनी बामनदेवाचा भंडारा साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी मोठ्या आस्थेवाईकपणे या भंडार्याचे सारसोळे ग्रामस्थांकडून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांना निमत्रंण दिले जातील, गणेश नाईक येण्याचे आश्वासन देतात. पण आजतागायत ना. गणेश नाईक या भंडार्याकडे एकदाही फिरकले नाहीत. यावर्षीदेखील या परंपरेत खंड न झाल्याने बामनदेवाला यंदाही ना. गणेश नाईकांच्या दर्शनाचा योग आलाच नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
सारसोळेचे युवा ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून सारसोळेची जेटी, जेटीवर हायमस्ट, जेटीवर जळालेली जाळी, नवीन जाळ्यासाठी कर्जरूपाने आर्थिक मदतीची अपेक्षा, बामनदेवाचा मार्ग आणि बामनदेवाच्या भंडार्यासाठी निमत्रंण यासह अन्य समस्यांच्या निवारणासाठी पालकमंत्री ना. गणेश नाईकांच्या जनता दरबारात सातत्याने चकरा मारत आहेत. ना. गणेश नाईकांकडून यापैकी एका समस्येचे निवारण करून सारसोळेच्या ग्रामस्थांचे समाधान करता आलेले नाही.
ना. गणेश नाईकांनी सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येत असलेल्या बामनदेव भंडार्याकरीता यावे यासाठी त्यांना निमंत्रित करीत असतात. परंतु आजतागायत एकदाही गणेश नाईकांना बामनदेवाच्या दर्शनासाठी येण्यास सवड मिळालेली नाही विशेष म्हणजे बामनदेव मंदीरापासून काही अंतरावरच असलेल्या पामबीच मार्गावरून गणेश नाईक सतत ये-जा करत असतात. गतवर्षीदेखील आपण भंडार्याच्या आदल्या दिवशीच येवू, मंडपात गप्पा मारू असे जनता दरबारात सांगितले. ना. गणेश नाईक येणार म्हणून गतवर्षी सारसोळेच्या ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली. पण ना. नाईक फिरकलेच नाही.
यावर्षीदेखील बामनदेव भंडार्याचे निमत्रंण सारसोळेच्या ग्रामस्थांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित जनता दरबारात बामनदेव भंडार्याचे निमंत्रण दिले होते. यावेळी येण्याचे ना. नाईकांनी आश्वासन दिले. तथापि ना. नाईक फिरकलेही नाही.
यापुढे ना. नाईकांना नो निमत्रंण!
दरवर्षी आस्थेवाईकपणे ना. गणेश नाईकांना बामनदेव भंडार्यासाठी निमत्रंण दिले जाते. ७ वर्षात ना. गणेश नाईक एकदाही भंडार्याला आले नाही. गणेश नाईकांना सारसोळेच्या ग्रामस्थांशी व बामनदेवाच्या भंडार्याशी फारसे देणेघेणे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया बामनदेव भंडारा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे. ना. नाईकांना भंडार्याला येण्याची इच्छाच नसल्याने यापुढे बामनदेवाच्या भंडार्यासाठी ना. नाईकांना निमंत्रण न देण्याचा मानस सारसोळेच्या ग्रामस्थांकडून यावेळी उघडपणे व्यक्त करण्यात आला.