नवी मुंबई : शिवसेना-भाजपा आणि आरपीआय महायुतीच्यावतीने नेरूळमध्ये २ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्याच्या पत्रकांमध्ये पालिकेतील शिवसेना प्रतोद म्हणून नगरसेवक रतन नामदेव मांडवेंचा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या आयोजकांना पालिकेत पक्षाचा प्रतोद कोण आहे, हे माहिती नसल्याचा संताप शिवसैनिकांकडून आळविला जात आहे.
महापालिकेच्या चौथ्या सभागृहात शिवसेनेने नगरसेवक रतन नामदेव मांडवेंना प्रतोद दिले होते. त्यानंतर या ऐरोलीतील सेना नगरसेवक राजू पाटील यांना प्रतोद पद देण्यात आले. रविवारी होणार्या निर्धार मेळाव्यासाठी जी पत्रके वाटण्यात आली, फेसबुकवर प्रकाशित करण्यात आली, त्यात नगरसेवक मांडवेंचा उल्लेख पक्षप्रतोद असा करण्यात आला आहे. दोन वर्षाहून अधिक काळ राजू पाटील हे महापालिकेतील पक्षप्रतोद असतानाही आयोजक असलेल्या शहरप्रमुखांना आपले पक्षप्रतोद माहिती नसावे याबाबत स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांमध्ये उलटसूलट चर्चा होत आहे.