नवी मुंबई :- दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबईकरांच्या अडीअडचणीला धावून जाणार्या व नवसाला पावणार्या सारसोळेकरांच्या बामनदेवाचा भंडारा भक्तीभावाने व भाविकांच्या उत्तुंग गर्दीमध्ये साजरा करण्यात आला.
गेल्या काही वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिनी साजरा होत असलेला पामबीच मार्गालगतच खाडीअर्ंतगत भागात सारसोळेकरांचा बामनदेवाचा भंडारा नवी मुंबईकरांमध्ये चर्चेचा व श्रध्देचा विषय बनू लागला आहे. सारसोळेकरांचा बामनदेव हा नवसाला पावत असल्याची प्रचिती अनेकांना येवू लागल्याने दरवर्षी भंडार्यात सहभागी होणार्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर भाविकांचा आकडा १५ हजाराच्या घरात पोहोचला होता.
सकाळी दहा वाजल्यापासून बामनदेवाच्या दर्शनासाठी भाविक येवू लागले. रात्री दहा-सव्वा दहाच्या सुमारास कुकशेत गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील यांनी सर्वात शेवटी दर्शन घेतले. बामनदेवाचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस व सिडको संचालक नामदेव भगत, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, नवी मुंबई लाइव्ह या वेबमिडीयाच्या संपादिका सौ. सुवर्णा खांडगेपाटील, शिवसेनेचे युवा नेते वैभव नाईक, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य रतन नामदेव मांडवे, विभागप्रमुख शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे, बाळू घनवट, विशाल विचारे, संजय चव्हाण, वितरक सेनेचे दिपक शिंदे, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, नगरसेवक रंगनाथ औटी, कॉंग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र भगत, परशूराम मेहेर, कैलास म्हात्रे, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका उपाध्यक्ष संजय धोतरे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव संदीप गलुगडे, मनविसे सांस्कृतिकचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विवेक सुतार, शहर सचिव विलास चव्हाण, शहर उपाध्यक्ष योगेश शामराव शेटे, विभाग उपाध्यक्ष विलास घोणे, शाखाध्यक्ष विठ्ठल गावडे, महादेव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष व माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक लढवय्ये नेते जयवंत सुतार, स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक संपत शेवाळे, प्रभाग अध्यक्ष तुकाराम टाव्हरे, आरपीआयचे पदाधिकारी सुनिल शिर्के पर्यावरणप्रेमी सुकुमार किल्लेदार, ब प्रभाग समिती सदस्य डी.डी.कोलते, युवा सेनेचे निखिल मांडवे, हेमंत पोमण, सामाजिक कार्यकर्ते तेजस मुनवर , गणेश इंगवले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेतील नगरसेवक खाडीअर्ंतगत भागात साजरा होत असलेल्या भंडार्यात भक्तिभावाने सहभागी झाले.
सारसोळे गावचे ग्रामस्थ या भंडार्याचे निमत्रंक होते तर गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाकडून या भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. भजन झाल्यावर नृत्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यत महाप्रसादाचे वाटप सुरू होते. हा भंडारा यशस्वी करण्यासाठी सारसोळेच्या ग्रामस्थांसह कोलवाणी माता मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम केले.