• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2025

शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार महादेव पवार यांचा लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज दाखल

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार महादेव पवार यांचा लोकवर्गणीतून उमेदवारी अर्ज दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेरूळ पश्चिम नोडमधील प्रभाग २३ मधून पुरुष खुल्या गटातून मध्यमवर्गीय परिवारातील नेरूळ सेक्टर सहा या कॉलनी विभागातील एव्हरग्रीन सोसायटीतील रहिवाशी असलेल्या महादेव पवार यांनी शिवसेना शिंदे गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील महादेव पवार हे एकमेव उदाहरण असे आहे की, महादेव पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघण्यापूर्वी काही वेळ अगोदर स्थानिक रहिवाशांनी स्वत: खिशातून निधी काढत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेला निधी उभा केला.

महादेव पवार, हा सर्वसामान्य कुटूंबातील सातारा भागातून नेरूळ सेक्टर सहामध्ये उपजिविकेसाठी आलेला सर्वसामान्य चेहरा. आज नेरूळ पश्चिममधील घराघरात ओळखला जाणारा चेहरा अशी महादेव पवार यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. महादेव पवारांनी स्वत:च्या कार्यातून स्वत:च्या पाठीमागे स्वतंत्र असा जनाधार निर्माण केला आहे. दिवस-रात्र जनसामान्यांसाठी धावपळ करणारा सर्वसामान्य बहूजन वर्गातील आपला माणूस, आपल्या घरातील माणूस, आपल्या हक्काचा माणूस अशी महादेव पवारांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. प्रभाग २३ मधून महादेव पवार शिवसेना शिंदे गटातून खुल्या गटातून निवडणूक लढवित असले तरी नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर ८,१०, १६,१६ अ व अन्य भागात महादेव पवारांची चांगली ओळख आहे. हा जनसंपर्क त्यांच्या सामाजिक कामातून निर्माण झालेला आहे. कोणाच्या घरातील लाईट जावो, सोसायटीच्या लाइटची समस्या निर्माण होवो, अगदी कोणाच्या घराचा दरवाजा लागलेला असो या किरकोळ समस्यांपासून महापालिकेत पाठपुरावा करुन नागरी समस्यांचे निवारण करणारे महादेव पवार सर्वांना आपला उमेदवार वाटत असल्याचे आज दिसून आले. महादेव पवार हा चेहरा आहे, खरे उमेदवार आपण आहोत. महादेव पवारांच्या विजयासाठी नाही तर आपल्या विजयासाठी राबायचे आहे, मतदान बाहेर काढायचे आहे, असा विचारही यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांकडून व्यक्तही करण्यात आला.

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास महादेव पवार निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले असता, लोकवर्गणीतून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रस्ताव उपस्थितांमधून मांडण्यात आला. सर्वांनी त्याला सहमती दर्शविली. अवघ्या पाच ते दहा मिनिटातच निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे संकलन करुन ते स्थानिक जनतेने महादेव पवारांच्या स्वाधीन केला. महादेव पवार हा मध्यमवर्गीय परिवारातील उमेदवार असल्याने त्यांच्यासाठी आपण सर्वांनी निधी उभारायचा व मतदानही मागायचे असा निर्धार यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आला. मतदान मागतानाच आपण घरोघरी जावून निधीही गोळा करायचा असा विचारही काहींनी यावेळी व्यक्त केला. लोकवर्गणीतून निवडणूक लढविणारे अनेकजण महाराष्ट्राने पाहिले आहे, पण नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात लोकांनी स्वत: निधी गोळा करुन निवडणूकीला उभे केलेले महादेव पवार एकमेव नेतृत्व आहे. जनता निधीही गोळा करणार आहे व मतदानही मागणार आहे, हे नवी मुंबईत नेरूळ पश्चिममध्ये प्रभाग २३ मध्ये पहावयास मिळाले आहे.

Previous Post

संदीप नाईकांच्या व्यूहरचनेकडे विरोधी पक्षांच्या नजरा खिळल्या !

Next Post

रविंद्र सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रभाग २२च्या समीकरणात बदल

Next Post
रविंद्र सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रभाग २२च्या समीकरणात बदल

रविंद्र सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे प्रभाग २२च्या समीकरणात बदल

योजा

योजा

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

सानपाड्यात काम करणाऱ्यावर अन्याय, विधानसभेला पक्षविरोधी काम करणाऱ्यांना न्याय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com