नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा डॉमिनीज पिझ्झा ते वजरानी स्पोर्टस क्लबदरम्यान पामबीच सर्व्हिस रोडलगत असलेल्या जॉगिंग ट्रकलगत ओपन जीम व शौचालयाची उभारणी करण्याची लेखी मागणी युवा सेनेचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ नेरूळ सेक्टर सहा डॉमिनीज पिझ्झा ते वजरानी स्पोर्टस क्लबदरम्यान पामबीच सर्व्हिस रोडलगत महापालिका प्रशासनाने जॉगिंग ट्रॅक व सायकल ट्रॅकची उभारणी केलेली आहे. या जॉगिंग ट्रॅकवर सकाळी व सांयकाळी चालण्यासाठी स्थानिक रहिवाशी ये-जा करत असतात. या ठिकाणी सेक्टर सहाच्या सुरुवातीलाच महापालिका प्रशासनाने ओपन जीम कार्यान्वित केली आहे. तशाच ओपन जीमचे पालिका प्रशासनाने वजरानी स्पोर्टस क्लबदरम्यान निर्माण करणे आवश्यक आहे. एकच ओपन जीम असल्याने या जॉगिंग ट्रॅकवर ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत असून त्यांना व्यायाम करता येत नाही. वजरानीजवळ ओपन जीम बनल्यास रहीवाशांना व्यायाम करण्याची संधी मिळेल व त्यांची होणारी गैरसोय होणार नसल्याचे निखिल मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच या जॉगिंग ट्रॅकवर केवळ एकाच ठिकाणी पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे शौचास तसेच लघुशंका आल्यास सकाळी व सांयकाळी या जॉगिंग ट्रॅकवर चालण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. सेक्टर सहाच्या सुरुवातीलाच ओपन जीमलगत सार्वजनिक शौचालयाची पालिका प्रशासनाने निर्मिती केल्यास लोकांना सुविधा उपलब्ध होवून त्यांची समस्या संपुष्ठात येईल. समस्येचे गांभीर्य व रहीवाशांची मागणी लक्षात घेता नेरूळ सेक्टर सहा डॉमिनीज पिझ्झा ते वजरानी स्पोर्टस क्लबदरम्यान पामबीच सर्व्हिस रोडलगत असलेल्या जॉगिंग ट्रकलगत ओपन जीम व शौचालयाची उभारणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.



