• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, February 11, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2026

रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

adminbyadmin
in रायगड
0
रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

‘सुखकर्ता’वर महेंद्रशेठ घरत यांनी केला विजयी उमेदवारांचा सत्कार
उरण : स्थानिक स्वराज्य संस्थांत महाराष्ट्रात भाजपची घोडदौड सुरू आहे. आमचा मित्र पक्ष असलेल्या शेकापची रायगड जिल्ह्यात अनेक वर्षे एकहाती सत्ता होती, परंतु त्यांनाही यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. असे असताना रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन जागा लढवल्या आणि दोन जिंकल्या. त्यामुळे आमचा कॉंग्रेसचा झेंडा रायगडमध्ये डौलाने फडकतोय, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. हे सर्व यश महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे आहे. तन, मन, धनाने काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी सॅल्यूट करतोय,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले.  
शेलघर येथे ‘सुखकर्ता’ बंगल्यावर महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेले डॉ. मनीष पाटील, अॅड. अविनाश ठाकूर यांचा सत्कार मंगळवारी (ता.१०) करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. मनीष पाटील म्हणाले, “मी जासई मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आलो. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले, हे मी कधीही विसरणार नाही. धनशक्तीविरुद्ध आमचा लढा होता, तो आम्ही आमचे नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली जिंकला आहे.”
यावेळी अविनाश ठाकूर म्हणाले, “महाविकास आघाडीचे सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मी जिंकलो. जिल्हा परिषदेची लढाई सोपी नव्हती, पण जनशक्ती आमच्या मागे होती. त्यामुळे आमचा विजय झाला. त्यामुळ सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो.”
उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले, “आमच्या मागे ठामपणे महेंद्रशेठ घरत होते. माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि शेकाप, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही हिरीरीने प्रचारात उतरले होते. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे.”

“उरणमध्ये पंचायत समितीवर महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असे मी म्हणालो होतो, ते कार्यकर्त्यांनी अपार मेहनतीने करून दाखवले आहे. उरणमध्ये आमचा भावना पॅटर्न चालला, येत्या काळातही आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावर जोमाने लढू,” असेही महेंद्रशेठ घरत यावेळी म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अलंकार परदेशी, जयवंत पाटील, किरण कुंभार, घनश्याम पाटील, शेखर ठाकूर, अजय म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, अलंकार पाटील, अजित ठाकूर, मनोज पाटील, मंगेश म्हात्रे, भाई पाटील, समीर ठाकूर, सुनील वर्तक, मीलन म्हात्रे, आकाश ठाकूर आदी काग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेबांना विजय समर्पित : महेंद्रशेठ घरत

Next Post

परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

Next Post
परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com