• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, March 29, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2026

परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम देण्याची मागणी

कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका प्रशासनाला साकडे

नवी मुंबई : परिवहन विभागातील वाहक-चालक, कर्मचारी-अधिकारी यांना मेडिक्लेम तत्काळ चालू करण्याची लेखी मागणी कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन व्यवस्थापकांकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये काम करणारे कर्मचारी-अधिकारी, चालक-वाहक यांच्यासाठी महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणारी मेडिक्लेम योजना ०२ जानेवारी २०२६ रोजी संपुष्ठात आलेली आहे. मेडिक्लेम योजना संपुष्ठात येवून आज महिना लोटला तरी प्रशासनाकडून नव्याने मेडिक्लेम योजना काढण्यात आलेली नाही, तसेच योजनेचे नुतनीकरणही करण्यात आलेले नाही. वाढत्या महागाईच्या तुलनेत आज परिवहन उपक्रमामध्ये चालक-वाहक, कर्मचारी-अधिकारी तुटपुंज्या वेतनामध्ये काम करत आहेत. साथीचे आजार, अन्य आजार, अपघात यापैकी संबंधितांना, त्यांच्या परिवारावर कोणते संकट निर्माण झाल्यास त्यांना मेडिक्लेमचाच आधार असतो. त्यांची कमी वेतनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असून मेक्लििम योजनेविना खासगी रुग्णालयात उपचार घेणे त्यांना शक्यही नाही. त्यामुळे मेडिक्लेम योजना संपल्याबरोबर या योजनेचे नुतनीकरण प्रशासनाकडून तात्काळ होणे आवश्यक आहे. या कामात प्रशासनाकडून दाखविली जाणारी उदासिनता ही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार आहे. घरामध्ये कोणी आजारी पडल्यास, अपघात झाल्यास या कर्मचाऱ्यांचा अथवा त्यांच्या परिवाराचा खर्च कोण करणार, याचा प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे. मेडिक्लेम नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी कर्ज काढावे लागण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता व मेडिक्लेम योजनेची कर्मचाऱ्यांना असलेली गरज पाहता आपण संबंधितांना मेडिक्लेम योजनेचे तातडीने विनाविलंब नुतनीकरण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

रायगडमध्ये कॉंग्रेसचा झेंडा डौलाने फडकतोय : महेंद्रशेठ घरत

Next Post

नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची युवा सेनेची मागणी

नवी मुंबई शहरातील गावागावामध्ये फायर हायड्रेंट यंत्रणा कार्यान्वित करण्याची युवा सेनेची मागणी

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण भाजपाला एक्सपोज करणे मी थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

कर्करोगविरोधी अभियान राबविण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com