जयेश खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : अॅम्यच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सन २०२५-२६ची राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद क्रिडा स्पर्धा ही अॅम्यच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ पुणेच्या वतीने २७ व २८ फेब्रुवारी या कालावधीत रिद्धी सिद्धी लॉन्स राजगुरुनगर चांडोली, पुणे नाशिक हाय वे, ता. खेड, जि. पुणे, या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत संलग्न जिल्हा कबड्डी असोसिएशन यांनाच सहभागी होता येणार आहे. जिल्हास्तर कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू मधून जिल्हा संघ निवडून सहभागी होईल व जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा अहवाल एकेएफएम यांना राज्यस्तर पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा वेळी सादर करावा लागणार आहे. जिल्हा पुरुष संघांना प्रवेश अर्ज विहित मुदतीत mhkabaddi@gmail.com या ई मेल वर पाठवावेत. स्पर्धा या मॅट वर दिवस रात्र या सत्रात होणार आहेत. स्पर्धा या साखळी व बाद पद्धतीने होणार असूनएकेएफएमच्या सर्व संलग्न जिल्हा कबड्डी असोसिएशन यांना स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पर्धा कालावधीत खेळाडू व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांनी गैरवर्तन केल्यास एकेएफएमने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी संघाना सहभागी होण्यासाठी राजकुमार राऊत ७७७४०५५३४३, अशोक देवकर ७०२०६२८७६२, रामदास रेटवडे ९८२२५०१२०३ संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
