• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, February 24, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 24, 2026

मर्द असाल तर माझ्या समोर येऊन लढा : आमदार मंदा म्हात्रे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

नवी मुंबई : ‘मर्द असाल तर माझ्यासमोर येऊन लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका,’ असे आव्हान देत आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील प्रस्थापितांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. बेलापूर येथील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

डी बेलापूर सेक्टर–१२ मधील भूखंड क्रमांक ४ वर महापालिकेमार्फत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यानंतर सिडकोने हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केला. विकास आराखड्यानुसार ही जागा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी राखीव असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकल्पाला पूर्वीपासून पाठिंबा असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

दरम्यान, संबंधित भूखंडावर स्थानिकांनी विकसित केलेले मैदान असून येथे ‘फोर्टी प्लस’ क्रिकेट सामने व सराव सुरू असतो. परिसरात अन्य मैदान नसल्याने खेळाच्या जागेचा बळी देऊ नये, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे. महापालिकेत भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी नव्याने समाविष्ट १४ गावांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे सांगत रुग्णालय त्या भागात हलवण्याची मागणी केली होती. त्यांच्या भूमिकेला सत्ताधारी भाजपमधील काही सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपच्या आमदारांना थेट भाजपकडूनच विरोध होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यावर प्रत्युत्तर देताना म्हात्रे म्हणाल्या, “कुठेही झाले तरी चालेल, पण रुग्णालय होणे गरजेचे आहे. घरातील आईला जशी मुलांची काळजी असते, तशी मला मतदारसंघातील नागरिकांची आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा मिळत नाही; म्हणून मी हा प्रकल्प आणला. असे म्हणत रुग्णालयाला जितकी जागा लागते तितकीच जागा द्या. मी तिथे रुग्णालय उभारेन असे त्यांनी म्हटले.

सीबीडी परिसरात सुमारे १२ मैदाने असल्याचा दावा करत त्यांनी विचारले, “या आठ एकर भूखंडाचा भविष्यात कोणाच्या फायद्यासाठी वापर करायचा आहे? ‘फोर्टी प्लस’च्या नावाखाली व्यावसायिक व्यवहार सुरू होते. मोठ्या कंपन्यांकडून पैसे घेतले जातात. तेव्हा कोणी आवाज उठवला नाही.” शाळांना भूखंड देताना पालकमंत्री कोण होते, १७ प्लाझा कोणाच्या आशीर्वादाने उभे राहिले, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी याप्रकरणी पडद्याआडून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली.

 “महिला काम करते म्हणून तुमचे नाक कापले जाते का? सभागृहात भाषा वापरताना भान ठेवले पाहिजे. मला कमी लेखू नका; मी कोणाला घाबरत नाही. जखम करा, पण चिमटे काढू नका,” असेही त्या म्हणाल्या.

आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नवी मुंबईतील राजकारण अधिकच तापले असून, येत्या काळात वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध आमदार मंदा म्हात्रे असा सुक्त संघर्ष आता अधिकच भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात याचे नवी मुंबईच्या राजकारणात काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य समितीवर प्रश्नचिन्ह

सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या महासभेत या प्रकल्पाला स्थगिती देऊन प्रस्ताव आरोग्य समितीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आमदार म्हात्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आरोग्य समितीकडे वर्ग झालेल्या प्रस्तावावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “रुग्णालय झालेच नाही तर आरोग्य समितीचा प्रश्न येतोच कुठे?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

रुग्णालय कोणत्याही परिस्थितीत होणारच अशी आपली भूमिका स्पष्ट करत त्यांनी “या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटले आहे. त्यांच्या आशीर्वादाने हे रुग्णालय बेलापूरमध्येच होणार. असल्याचा दावा केला. यावेळी बोलताना, आज माझी किंमत कळणार नाही; पण रुग्णालय सुरू झाल्यावर कळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आयुक्तांशी चर्चा करून नियमावली तयार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

Next Post

बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून सरकारचे अभिनंदन

Next Post
बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून सरकारचे अभिनंदन

बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून सरकारचे अभिनंदन

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेमार्फत विविध स्पर्धांसह कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेमार्फत विविध स्पर्धांसह कार्यक्रमांचे आयोजन

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार नेतृत्व

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार नेतृत्व

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com