• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 28, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 27, 2026

सिडकोच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोलीतील घरांच्या विक्रीसाठी मुदतवाढ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सिडकोच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोलीतील घरांच्या विक्रीसाठी मुदतवाढ

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी १९ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

“माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभली असून नागरिकांना सोयीस्कर व सक्षम शहरी जीवनशैलीची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठीची व आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अर्ज नोंदणीसाठी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. योजनेसंदर्भातील सर्व अधिकृत व अद्ययावत माहिती सिडकोतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकांद्वारे तसेच सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून वेळोवेळी प्रसारित केली जाते. त्यामुळे नागरिकांनी योजनेविषयी इतरत्र उपलब्ध होणाऱ्या अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

म्हाडाची सोडतीविना मिळालेली घरे विकण्यासाठी पाच वर्षे थांबा

Next Post

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप शिवसेनेची मंजुरी, कशी भरणार महापालिकेची तिजोरी?

Next Post
उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप शिवसेनेची मंजुरी, कशी भरणार महापालिकेची तिजोरी?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप शिवसेनेची मंजुरी, कशी भरणार महापालिकेची तिजोरी?

राजगुरुनगर येथे राज्यस्तरीय पुरुष अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

मुंबईमध्ये कबड्डी स्पर्धांसाठी ‘स्वस्तात’ मैदाने होणार उपलब्ध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com