मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हिंद दि चादर” या कार्यक्रमामध्ये केली घोषणा
संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला होता. त्याचं अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. रविवारी खारघर येथे “हिंद-दि-चादर” या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेलापूर येथील भूखंड क्र. ४, सेक्टर १५ ए येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला सीख धर्माचे नववे गुरु “गुरु तेग बहादूर साहिबजी” यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे नवी मुंबईमधील सीख समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचे नवी मुंबईतील शीख बांधवांनी आभार मानले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई, राज्य व देशातील लोकांचे कोव्हीड महामारीत झालेले हाल पाहता व भविष्यात नवी मुंबईतीची वाढती लोकसंख्या व इतर गोष्टींचा सारासार विचार करून सर्व सामान्य नवी मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून मागील ५-६ वर्षापासून आपल्या नवी मुंबई परिसरात महापालिकेचे स्वत:चे हक्काचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज असावे, याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार, सिडको व न.मुं.म.पा प्रशासन यांच्याकडे सततच्या पाठपुरावा केला असून आज त्याला एक मूर्त स्वरूप आले आहे.
