• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 12, 2026

संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे : कामगार मंत्री आकाश फुंडकर 

adminbyadmin
in ठाणे
0
संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर  घ्यावे : कामगार मंत्री आकाश फुंडकर 

संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपावर तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात औद्योगिक शांतता कायम  ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.  बैठकीत कामगार मंत्री फुंडकर बोलत होते.

बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वन्हाळकर अप्पर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १ डिसेंबर २०२५ पासून संपावर आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक आहे. संप करण्यामागे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवीयदृष्टीने कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कामगार व कंपनी हिताचा सुवर्णमध्य साधत कंपनी संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावेत. कायम व कंत्राटी कामगारांच्या अडचणी समजून घेत, त्यांना यशस्वीपणे सोडविण्यात यावे.

निलंबित केलेल्या कामगारांना सेवेत घेतल्यानंतर कामगारांनी संप मागे घ्यावा. याबाबत करण्यात येणारे आंदोलनही स्थगित करावे, असे आवाहनही यावेळी कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी केले.

Previous Post

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅसचा तुटवडा : हर्षवर्धन सपकाळ

Next Post

पामबीचवर बेकायदा जाहिरात फलकांच्या सुळसुळाटाविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांची लक्षवेधी

Next Post
पामबीचवर बेकायदा जाहिरात फलकांच्या सुळसुळाटाविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांची लक्षवेधी

पामबीचवर बेकायदा जाहिरात फलकांच्या सुळसुळाटाविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांची लक्षवेधी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com