• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 13, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 13, 2026

गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची कामे पूर्ण करा : मंगलप्रभात लोढा

adminbyadmin
in मुंबई
0
गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची कामे पूर्ण करा : मंगलप्रभात लोढा

तेजल नेने-मोरजकर : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : गिरगावातली प्रसिद्ध हिंदु नववर्ष गुढीपाडव्याची शोभायात्रा विनासायास आणि उत्साहात पार पाडावी याची जोरदार तयारी सुरू असून या अनुषंगाने तिथल्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली. गुढीपाडव्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याने कामाचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातले सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असून नागरिकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

गिरगावमधील विठ्ठलभाई पटेल रोड आणि जगन्नाथ शंकरशेट रोड तसेच खेतवाडी आणि प्रार्थना समाज या भागात जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. गुढी पाडव्याच्या शोभायात्रेच्या या मार्गांवर कामं सुरू असल्याने शोभायात्रेत अडचण येण्याची शक्यता असल्याने मंत्री लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह कामाचा आढावा घेतला. कामं  सुरू असलेल्या रस्त्यांवर सकाळी आठ वाजे पासून ते १० वाजे पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच पाडव्याच्या आधी म्हणजेच १७ मार्च पूर्वी कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करून रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचे आदेश यावेळी मंत्री लोढा यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांना तात्काळ हटवण्याचे निर्देश ही यावेळी देण्यात आले.

शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण न होता वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही निर्देश मंत्री लोढा यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

गिरगावची गुढीपाडवा शोभायात्रा ही हिंदू नववर्षाच्या स्वागताचा एक भव्य, पारंपरिक आणि उत्साही सोहळा आहे. या यात्रेत ढोल-ताशांचा नाद, महिलांची बाईक रॅली, नऊवारी साडीतील रणरागिणी, आणि ऐतिहासिक विषयांवरील चित्ररथ आकर्षणाचे केंद्र असतात. दरवर्षी गुढीपाडव्याला पहाटेपासूनच  गिरगावच्या रस्त्यांवर मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. अशा उत्सवात केवळ रस्त्यांच्या कामामुळे विरजण पडू नये ही आमची भूमिका असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous Post

पामबीचवर बेकायदा जाहिरात फलकांच्या सुळसुळाटाविषयी आमदार मंदाताई म्हात्रे यांची लक्षवेधी

Next Post

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

Next Post
आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महापालिका सलग अकराव्यांदा मानकरी

थकीत मालमत्ता करावर ९० टक्के सवलत देण्याची युवा सेनेची मागणी

महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

महापौर सुजाताताई पाटील यांच्या उपस्थितीत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा आरंभ

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार : मंत्री नितेश राणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com